मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चाही समोर येत आहेत. अशातच आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुप्त बैठक झाल्याची बातमी समोर आली आहे.
राजकीय वर्तुळात सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर युती, आघाड्यांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार असल्याची राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अशातच आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची बातमी समोर आली आहे.
शिवतीर्थ निवासस्थानी १ तास गुप्त बैठक..
आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुती सहभागी होणार असल्याच्या चर्चाही समोर येत आहेत. अशातच आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुप्त बैठक झाल्याची बातमी समोर आली आहे.












