बुधवार दिनांक ५/७/२३ रोजी नेहरूनगर, पिंपरी नविन कोर्टात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ व कार्यकारणीमार्फत वकिलांसाठी कायदेविषयक व्याख्यानमाला २०२३ च्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे वक्ते म्हणून डॉ. ॲड. सुधाकरराव आव्हाड सर (मा. अध्यक्ष बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र व गोवा) यांनी स्पेसिफिक रिलीफ अँक्ट व त्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या दुरुस्त्या या विषयावर व्याख्यान दिले व त्याविषयीच्या बुकलेट्सचे वकिलांना वाटप करण्यात आले. कार्यक्रचे अध्यक्ष म्हणून ॲड. मारुती भापकर सर व प्रमुख उपस्थिती मा. अध्यक्ष ॲड. विलास कुटे सर यांनी पुणेरी पगडी घालून सन्मान चिन्ह देऊन व्याख्याते डॉ. आव्हाड सर यांचा सत्कार केला. तसेच कमिटी व प्रमुख वक्ते यांचे हस्ते १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. नव्याने झालेल्या कोर्टात बार असोसिएशनच्या विद्यमान उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे व मा. अध्यक्ष ॲड. विलास कुटे यांच्या संयुक्त विद्यमाने बार असोसिएशनला आसन व्यवस्थेसाठी १८खुर्च्या देण्यात आल्या. कार्यक्रम प्रसंगी बार असोसिएशनचे सचिव ॲड. गणेश शिंदे, महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, ऑडिटर राजेश रणपिसे सदस्य ॲड. स्वप्निल वाळुंज, ॲड. प्रशांत बचूटे, ॲड. पवन गायकवाड व इतर वकील बंधू भगिनी व विधी महाविद्यालयाचे विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचलन ॲड. गणेश शिंदे व ॲड. विश्वेश्वर काळजे यांनी केले तसेच ॲड. मंगेश नढे यांनी आभार मानले.
पिंपरी चिंचवड कोर्टात डॉ. ॲड. सुधाकरराव आव्हाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन











