पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.०७ : आज-काल कोणत्या भांडणाचा राग कोठे निघेल हे सांगता येत नाही. किरकोळ भांडणातून गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील घडत असतात अशीच एक घटना येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
साहिल शेख ( वय १८, रा.इंदिरानगर, विश्रांतवाडी, पुणे ) याने अभिषेख उर्फ अभी रमेश तांबे ( वय २१, रा. लेन नंबर ८,मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे ), सुमित नागेश लंगडे ( वय २५, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड, पुणे ) यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे त्यांच्या घराकडे जात असताना आरोपींनी त्यांच्या आत्याच्या मुलाच्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी संगनमत केले. फिर्यादी हे घराकडे जात असताना थांबवून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांना जीवे ठार मारण्यासाठी त्यांच्याकडील धारदार शस्त्राने डोक्यावर वार केला आणि त्यांना गंभीर जखमी केले.
आरोपींवर भादवि कलम ३०७,३२३,५०४,५०६,३४, आर्म ॲक्ट ४ (२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट ३ व ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेच्या कांचन जाधव या करीत आहेत.












