शहरामध्ये वाढत्या घरफोडीच्या अनुषंगाने युनिट दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने व अमोर सरडे यांना त्यांच्या बातमीदार मार्फत आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आरोपीला अटक करुन त्याची कसून चौकशी केली असता, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला. पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली कटावणी, चावीचा जुडगा जप्त केला. याशिवाय इतर गुन्ह्यातील ७७.२६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ४३ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन सिहंगड आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आरोपी विकास घोडके हा रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी चोर असून त्यावर ठाणे, कल्याण, पिंपरी-चिंचवड, लातूर तसेच
पुणे शहर भागामध्ये ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आरोपीने सोन्या- चांदीचे दागिने प्रतीक सुरेश दहिवाळकर (वय २२ वर्ष, धंदा – सोनार कारागिरी, रा. मारवाडी गल्ली, शेवगाव, जिल्हा अहमदनगर), रोहन उर्फ दुध्या चव्हाण (रा. आईना हॉटेल जवळ, नाना पेठ, पुणे) यांना विक्री केल्याचे सांगितल्याने त्यांना गुन्ह्यात भादवी कलम ४११ प्रमाणे कलम वाढ करून ते मिळून न आल्याने त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा.पो.आयुक्त गुन्हे सुनील तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार, पोलीस उप-निरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार अमोल सरडे, गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, उज्वल मोकाशी, साधना ताम्हणे, शंकर नेवसे संजय जाधव, गणेश थोरात,निखिल जाधव, विनोद चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.