भाजपाच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी महिला खेळाडूच्या आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला असल्याचे दिसत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाविरोधात आंदोलन अनेक महिन्यापासून सुरू आहे. पण या आंदोलनावर निर्णय तर सोडाच कोणताही भारतीय जनता पक्षाचा राजकीय नेता बोलायला सुद्धा तयार नाही. बुधवारी प्रीतम ताई मुंडे यांनी बीडमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये आंदोलनावर प्रश्न विचारला असता प्रीतम मुंडे म्हणाल्या “एक महिला म्हणून माझं मत आहे कोणत्याही महिलाची अशा प्रकारची तक्रार येते तेव्हा त्याची तपासणी झाली पाहिजे दखल घेतली गेली पाहिजे जर दखल घेतली जात नसेल तर लोकशाहीमध्ये हे स्वागताहार्य नाही” . तसेच योग्य लोकांनी त्याची दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली
राज ठाकरे पाठिंबा देत महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात स्वतः लक्ष घालून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यावर तोडगा काढावा असे विनंतीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले. त्याचबरोबर काँग्रेसने त्या प्रियंका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंदर सिंग हुडा आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. सर्वांचे लक्ष आता याकडे वेधले गेलं आहे की मोदी सरकार या आंदोलनाची दखल घेऊन तोडगा काढणार कधी !
सरकारकडून कोणी गेले नाही ही बाब निश्चितच खेदाची आहे: प्रीतम मुंडे












