अँटी करप्शन ब्युरो सांगली कार्यालयात सोमवारी दिनांक २6 मे 2023 रोजी तक्रार दाखल झाली होती. तक्रारदार यांच्या वडिलांचे नावे प्रधानमंत्री आवास योजनेमधून निधी मंजूर झाला होता. या निधीचा तिसरा व चौथा हप्ता जमा करण्यासाठी लोकसेवक श्री अजित मुल्ला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, वर्ग 3 पंचायत समिती, कवठेमहाकाळ यांनी तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांची लाच (Corruption) मागितली होती.
अँटी करप्शन ब्युरो सांगली विभागाने आलेल्या तक्रारीनुसार पडताळणी केली. त्यावेळेस श्री मुल्ला यांनी तडजोड केली असून तक्रारदाराकडे 13000 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपाधीक्षक व त्यांच्या टीमने सापळा रचून मंगळवारी 30 मे रोजी 13 हजार रुपये लाच घेताना मुल्ला यांना रंग हात पकडले.
याप्रकरणी कवठेमहाकाळ पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमात खाली गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची कारवाई श्री अमोल तांबे पोलीस उपायुक्त अँटी करप्शन ब्युरो पुणे आणि श्री विजय चौधरी पोलीस उपायुक्त अँटी करप्शन ब्युरो पुणे (ACB Pune) यांच्या मार्गदर्शनानुसार श्री संदिप पाटील पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो सांगली (ACB Sangli) आणि त्यांच्या टीमने केली.












