आपण पाहतो आधी मोठया प्रमाणात स्त्री भ्रूण हत्या ही व्हायची.पण त्याच्यावर आता सरकारी निर्बंध लावण्यात आल्यामुळे डॉक्टर हे अशा गुन्ह्यात साथ देत नाहीत.म्हणून मुलगी नको असणारे वेगळा मार्ग अवलंबू पाहत आहेत.अशाच दोन घटना पुणे शहरात (Pune News) घडल्या आहेत.
विजय भोसले [ पोलीस नाईक ] यांनी विमानतळ पोलीस स्टेशन तर बबलू शेख [ वय ३३ रा.खांडवेनगर,विमाननगर पुणे ] याने येरवडा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवली असून दोन अज्ञात व्यक्तींचा शोध सुरु आहे.
दि.३० व ३१ रोजी या दोन्ही घटना घडल्या असून एका ठिकाणी खुळेवाडी तर दुसऱ्या ठिकाणी आगाखान पूल अशा दोन वेगवेगळ्या जागी ५-६ महिन्यांची स्त्री जातीची दोन अर्भक सापडली आहेत.या अर्भकांचा (Infant) जन्म अनैतिक संबंधातून किंवा संबंधातून झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांची जबाबदारी न स्वीकारता त्यांना जन्म देऊन दोन अज्ञात व्यक्ती त्यांना उघड्यावर टाकून निघून गेल्या म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये भादंवि ३१७,अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही विमाननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बी.बी.वाकडे हे करत आहेत तर येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड ह्या करत आहेत.












