नागपूर : नागपूर येथे शनिवारी आधीस्विकृती समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मराठी पत्रकार परिषद नागपूर विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला पूर्व नागपूर विभागातील पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी जिल्हा जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये पत्रकारांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. याच वेळी पत्रकारांचे सदस्य संख्या वाढण्यावर भर द्यावा असेही या बैठकीत नमूद करण्यात आले. या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख,विश्वस्त किरण नाईक, जिल्हा अध्यक्ष शरद पाबळे, महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी पाटील, महिला पदाधिकारी शोभा जयपुरकर ,राज्यउपाध्यक्ष शिवराज काटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नावर सांगोपांग आपले विचार मांडले. पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्न ,आधी स्विकृतीचा प्रश्न पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न, पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याचा प्रश्न आधी प्रश्नावर त्यांनी सविस्तर विवेचन केले .यावेळी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक , राज्यअध्यक्ष शरद पाबळे महिला अध्यक्षा जान्हवी पाटील शिवराज काटकर, चंद्रपूरचे गोपाल रायपुरे आदींनीही आपले विचार मांडले. शेवटी आभार अविनाश भांडेकर यांनी मानले या बैठकीला नागपूर , भंडारा गडचिरोली चंद्रपूर ,वर्धा आदी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.