पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे नाव निश्र्चित झाले आहे. अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीकडून कोण उमेदावार असेल,याबाबत अद्यापही निश्र्चित नाही शिवसेनेकडून (ठाकरे गट) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.मुख्यमंञी एकनाथ शिंदे य़ांनी ठरवलं तर ऱाष्ट्रवादा काँग्रेसनं मनावर घेतलं तर शिरूर लोकसभा राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून लढण्याबाबत सूचक विधान आढळरावांनी नुकतेच केलं. त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी नुकतीच बैठक झाली.बैठकीत पक्ष कुठलाही असो खासदार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता काम करणार आहे. असे एकमत बैठकीत झाले. त्यामुळे शिरूरच्या मैदानात अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले , माजी आमदार विलास लांडे यांनी शिवाजीराव आढळरावांच्या राष्ट्रवादीतील उमेदवारीला थेट विरोध दर्शविला आहे.
शिरूर लोकसभा मतदासंघात खासदार अमोल कोल्हे विरोधात महायुतीकडून उमेदवारांची अदलाबदल करून आयात उमेदवार देण्याच्या चर्चा सुरू असताना. अजित पवार गटातील कार्य़कर्ते मान्यता देतील कि नाही याबाबत संभ्रम असल्याची भूमिका आहे. यात विलास लांडे यांनी आढळरावांना अप्रत्यपणे विरोध केला आहे.महायुतीत शिरूरची जागा अजित पवार गटाला जाणार असल्याने कोल्हे यांच्या विरोधात आढळराव पाटीलांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्याबाबत चर्चा सुरू असताना विलास लांडे बंड करण्याच्या तयारीत आहे. उमेदवार आयात करणार असाल माझी ही विचार करून निर्णय घ्यावा .असं सुचक विधान त्यांनी केलं आहे.शिरूरमधून तीन वेळा इच्छुक होतो, शिरूर मतदार संघावर माझं प्राबल्य असल्याने उमेदवार आयात करण्याची गरज नसल्याचे मतही विलास लांडे व्यक्त केल आहे. त्यामुळे विसास लांडेनी उमेदवार अदलाबदीच्या प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या विरोधात विलास लांडे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणारा का अशी सध्याची शिरूरची राजकीय परिस्थिती आहे.












