पुणे प्रतिनिधी
पुणे, दि.- १४ : महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरुवार रात्री येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) केंद्राला अचानक भेट दिली व बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली.
यावेळी डॉ.नारनवरे यांनी मुलांची राहण्याची सोय, त्यांना देण्यात येणारे जेवण, सुविधा, शासनाकडून देण्यात येणारी मदत आदींची माहिती घेतली. येथे असणाऱ्या २२ विधि संघर्ष ग्रस्त मुलांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बालविकास उपायुक्त राहुल मोरे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) केंद्राचे अधिक्षक दत्तात्रय कुटे, उपअभियंता नितीन पवार व इतर कर्मचारी उपस्थित होते.












