पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १४ : पुणे शहर पोलीस आयुक्तालय वारजे माळवाडी पोलीस स्टेशन तर्फे मॉडर्न हायस्कूल पॉप्युलर नगर येथे जनजागृती विषय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सत्यप्रेम तोंडे, पोलीस शिपाई पाटील यांनी विद्यार्थ्यांना जनजागृती अभियानांतर्गत विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
अंमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे होणारे दुष्परिणाम, वाढती व्यसनाधीनता, सायबर फ्राॅड, वाहतूक नियमन, गुड टच, बॅड टच, बाल गुन्हेगारी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच काही अडचण असल्यास ११२ किंवा वारजे पोलीस स्टेशनच्या संपर्क क्रमांक डायल करण्याचे आवाहन केले.
या जनजागृती अभियानामध्ये पोलीस निरीक्षक जयतापूरकर, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत पाटील, पोलीस हवालदार सत्यप्रेम तोंडे, शाळेतील शिक्षक चिंचोलकर मॅडम,कदम सर व एकूण १८० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.











