जळगाव : राजकारण काय राजकारण सुरूच राहील. राजकारण म्हणजे छापा- काटा. निवडणुकांच्या आखाड्यातील कुस्ती होईल तेव्हा पाहून घेऊ. पण जे सामाजिक काम करतो आहे. त्याच्यामुळे रात्री लेटल्याबरोबर शांत झोप लागते या शब्दात जळगाव ग्रामीण मतदार संघातील विकास कामांवरून टीका करणाऱ्या विरोधकांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी अनोख्या शैलीत विरोधकांवर फटकेबाजी केली आहे. रोज मी माझा कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना त्रास देत असतो. रोज हे माझ्यामागे असतात. यांचे मला जे सहकार्य लाभत आहे, असे कार्यकर्ते पदाधिकारी लाभले आहे याचा मला अभिमान असून हीच माझी कमाई असल्याचे त्यांनी म्हटले आहे.