आपल्या आईला बाहेरचे कोणी काही बोलले तर ते आपणास सहन होत नाही. शिवी दिली तर राग तर आपल्या डोक्यातच जातो. अशीच एक घटना तळेगाव दाभाडे परिसरात घडली आहे.
अंकुश रमेश कांबळे ( वय २५ रा. तळेगाव दाभाडे, ता.मावळ जि.पुणे )असे फिर्यादीचे नाव असून त्यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
सुरज नागनाथ तुपसुंदरे ( वय २८ रा. चिंचवड ,पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने फिर्यादीच्या आईला शिवीगाळ केली होती. त्याच कारणाहून फिर्यादीने आरोपीला जाब विचारला होता. फिर्यादीने जाब विचारल्याच्या कारणाने चिडून जाऊन आरोपीने फिर्यादीच्या अंगावर धावत येत शिवीगाळ केली आणि तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत आरोपीने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या उजव्या बाजूस वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
आरोपीवर भादवी कलम ३०७,५०४,५०६ आर्म ॲक्ट ४२५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक साळी हे करत आहेत.












