पुणे : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण जेष्ठ नागरिक बाजीराव काळभोर व बबनराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅग, शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.शिवसेना ज्येष्ठ नेते श्री दिलीपशेठ पांढरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सौ प्राजक्ता पांढरकर यांनी मनोगत व्यक्त केले की “या दिवशी सर्व भारतीय नागरिकांना लोकशाही द्वारे सर्व मूलभूत अधिकार मिळाले संविधानाद्वारे आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा आपण योग्य तो उपयोग केला
पाहिजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यवीराच्या विचारांचा संघर्षाचा आदर्श घेऊन आपण या पुढील आपलं भविष्य जीवन हे चांगल्या पद्धतीने घालवावा तसेच देशाच्या रक्षणासाठी आपले जवान वीर सीमेवर संरक्षण करतात त्यांच्यामुळे आपण सुरक्षित असतो या दिवशी त्यांची आपण आठवण काढली पाहिजे ”
कार्यक्रमास उपस्थिती – श्री अशोक काळभोर, श्री सुरेश लिंगायत, श्री रामभाऊ सुपेकर, श्री राहुल जाधव, शिराज पठाण, श्री शैलेश वाल्हेकर, सौ वत्सला जाधव, सौ दुर्गा पांढरकर, सौ अश्विनी बागुल, सौ पुष्पा चव्हाण, सौ सोनाली वाल्हेकर, सौ सुनंदा चौधरी सूत्रसंचालन व आभार हर्षवर्धन पांढरकर, अनिल जाधव यांनी मानले












