राज्या सरकारने निर्णयांचा धडाकाच लावला आहे. राज्य सरकारच्या वतीने दोन दिवसात २६९ शासन निर्णय घेण्यात आले आहेत. निधी वाटपासह पदस्थापना, जलप्रकल्प, विविध रस्त्यांची काम तसेच कोकणातील विविध कामांचा समोवेश या मध्ये आहे.
आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल २६९ शासन निर्णयांचा धडाका राज्य सरकारने लावला आहे. पदस्थापना,जल प्रकल्प, कोकणातील कामे निधींची पूर्तता अशा शासन निर्णयाचा यामध्ये समावेश आहे. आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय जारी करून कामे आटपण्याची राज्य सरकारला घाई असल्याचं यातून दिसत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते त्यामुळेच राज्य सरकारने सहा आणि सात मार्च या दोन दिवसात गतिमान पध्दतीने तब्बल २६९ शासन निर्णय जारी केले आहेत. ७ मार्च रोजी १७३ शासन निर्णय तर ६ मार्चला ९६ शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.
निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास सर्व कामे ठप्प होऊ नयेत, आणि आठ नऊ आणि दहा मार्चला सलग सुट्टयाचा विचार करून तातडीने ६ आणि ७ मार्च रोजी शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने निधी वितरणाचे शासन निर्णय राज्य उत्पादन शुल्का सारख्या महत्वाच्या विभागातील पदस्शापना कोकणातील काही योजनांना मान्याता देण्यासंदर्भातील शासन निर्णय यांचा समावेश य़ामध्ये आहे. आता यामध्ये सोमवारी, मंगळवार या दोन दिवसात मंञिमंडळाची बैठक घेऊन काही महत्वाचे निर्णय यामध्ये घेतली आज्याची अपेक्षा आहे.












