पुणे । प्रतिनिधी
पुणे दि. १५ : आम आदमी पक्षाच्या राज्य प्रवक्तेपदी पुण्याचे मुकुंद किर्दत यांची नियुक्ती करण्यात आली आहे . उच्चशिक्षित अभियंते व व्यावसायिक असलेले मुकुंद किर्दत अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळींबरोबर जोडलेले आहेत.
गेली नऊ वर्षे ‘ आप ‘ बरोबर कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात त्यांचे विशेष काम आहे . पुणे महानगरपालिका संबंधित मुख्यत्वे अॅमिनिटी स्पेस , अग्निशमन वाहन घोटाळा , टोल प्रश्न , कंत्राटी भरती आदी प्रश्नांवरती आंदोलने केली आहेत .
सन २०१९ मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती . यापूर्वी त्यांनी पुणे शहर व पुणे विभाग तसेच पक्षाच्या राज्य मीडिया टीमची जबाबदारी सांभाळली आहे.












