बुलढाणा : शिवसेना शिंदे रगटातील आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेच्या वर्तुळामध्ये असलेले आमदार गायकवाड हे वाघाच्या दातामुळे पुन्हा एकादा चर्चेत आले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी मोठ्या कौतुकावने आपण वाघाची शिकार केली असून त्याचा दात गळ्यात घातल्याचे वक्तव्य केले आहे. यानंतर वन विभागाने त्यांच्यावर कारवाईचा बडरगा उगारलेला आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहरात शिवजंती कार्यक्रमला उपस्थिती लावली आह होती. यावेळी मुलाखतीमध्ये थाटात कौतुकाने उत्तर दिले ते म्हणाले,माझ्या गळ्यातील लॉकेटमध्ये वाघाचा दात आहे. त्या वाघाची १९८७ मध्ये मी शिकार केली होती. असे संजय गायकवाड यांनी सांगीतल आहे.मुलाखत घेणाऱ्या पुन्हा विचारले वाघ होता की बिबट्या मग पुन्हा गायकवाड म्हणाले वाघच बिबट्या वगैरे तर मी असेच पळवतो. असे उत्तर आमदार संजय गायकवड यांनी दीले.त्यांच्या या वाक्तव्यानंतर विरोधकांनी आणि काही अभिनेत्यांनी त्याच्यावर कारवाई करा असी मागणी केली आहे. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई केली आहे.
अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला . वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कायद्या नुसार आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गळ्यातील लॉकेटमध्ये वाघाचा दात आहे त्यांच्या या दाव्यानंतर वन विभागाने ते लॉकेट आपल्या ताब्यात घेतली असून ते डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे देखील वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
अभिनेता हेमंत ढोमे यांची X वरची पोस्ट
या शिकारी बाबू च्या गळातला दात कायद्याने घशात घालण्यात यावा ही वन खात्याला नम्र विनंती ! आणि असे लोकप्रतिनीधी असतील तर कठीण आहे. आपलं.. तुम्हाला शौक करायला नाही तर आमची महाराष्ट्राची वन्य संपत्तीची पर्यावरणाची सेवा करायला निवडून दिलंय! लक्ष द्या या ट्टिटमध्ये हेमंत भूपेंद्र यादव आणि सुधीर मुनगंटीवार यांना टॅग देखील आहे.











