घोटावडे परिसरातील गोडांबेवाडी क्रमांक दोन मधील ग्रामस्थ , महिला व मुलींनी मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दि.२९ कँडल मार्च काढला होता.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सायंकाळी सहा वाजता हा मोर्चा काढण्यात आला . गावच्या विठ्ठल रूखमाई मंदिर समितीसमोर सभा घेण्यात आली .
यावेळी शिल्पा , मानसी , काजोल गोडांबे यांनी मनोगत व्यक्त केले . येथील बारावाड्यामध्ये मोर्चा काढण्याचे नियोजन केले . तसेच दिनेश खानेकर , शाम गोडांबे , गणेश गोडांबे , शरद गोडांबे यांनी मुळशी बंदला ग्रामस्थांचा पाठिंबा जाहिर केला . तसेच बारा वाड्या व गावठाण असा एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी जाहीर झाला .












