भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या अनेक नवीन चेहऱ्यानं संधी देण्यात आली आहे. तर काही जुन्या चेहऱ्यानं वगळण्यात आले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना स्थान मिळाले नाही. त्याचबरोबर संघाबाहेर असलेला युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनलाही या संघात स्थान मिळालेले नाही.मात्र, निवड समितीने उत्तर प्रदेशचा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलला संधी देऊन सर्वांनाच चकित केले आहे, जो पहिल्यांदाच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचा भाग होणार आहे. श्रेयस अय्यरही संघात कायम आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार असून ती 11 मार्चपर्यंत चालणार आहे. लांबलचक मालिका पाहता बीसीसीआयने सध्या फक्त पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीसाठीच संघ जाहीर केला आहे. पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये तर दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे.
पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ
– रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.












