पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २७ : इंटरनेट व्यावसायिकाकडे दरमहा दहा हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींस अटक करण्यात आलेली आहे. ही घटना चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
निखील शिवा कांबळे ( वय- १९ वर्ष, रा. मरगम्मा देवी मंदिरा समोर, पांडवनगर, पुणे ), अतुल अनिल धोत्रे ( वय २१ वर्ष, रा. जुनी वडारवाडी, कुसाळकर बिल्डिंग, पुणे ), तेजस शिवाजी विटकर ( वय २१ वर्ष, रा. ब्लॉक नं. ३०, भाभा हॉस्पिटलचे मागे, वडारवाडी, पुणे ) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वडारवाडी येथे इंटरनेटची एरियल फायबर टाकण्याचे काम करतात. पण आरोपी यांनी ते काम जबरदस्तीने थांबवून तुम्ही आमची परवानगी घेतली का, वडारवाडी पांडवनगर भागात आमच्या परवानगीशिवाय कोणी केबलचे काम करत नाही, जर तुम्हाला काम करायचे असल्यास आम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणत खंडणीची मागणी केली.
आरोपींविरोधात भादवि कलम ३८४,३८५,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २, श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार, विजय गुरव, प्रदिप शितोळे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, राहुल उत्तरकर, सदोबा भोजराव, शंकर संपते, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.












