देहूगाव येथील इंद्रायणी नदीच्या काठावर एका व्यक्तीच्या डोक्यात मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. २२) पहाटे पाच वाजता उघडकीस आली.
देविदास मारुती भराडे (वय ४२, रा. शिवबा चौक, सुसगाव, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विकास बंडू घुगे (वय २३, रा. महादेव नगर, सुसगाव, पुणे. मूळ रा. मंगरूळ बुद्रुक, परभणी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २१) रात्री अकरा ते बुधवारी पहाटे सव्वा पाच वाजताच्या कालावधीत अज्ञातांनी फिर्यादी यांचे मामा देविदास भराडे यांच्या डोक्यात मारहाण करून खून केला. हा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.












