पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १६ : पुणे शहरातील ई – बाईक चोरणाऱ्या सराईत आरोपीस पोलिसांनी अटक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
विश्रुत भालचंद्र नवाथे ( वय ३९, रा. वाघजाई नगर, आंबेगाव खुर्द, पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना हा गुन्हा अटक करण्यात आलेल्या आरोपीनेच केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना तो सच्चाई माता येथील पाण्याच्या टाकीजवळ मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत त्यात चोरलेल्या ई – बाईक बद्दल देखील सांगितले. त्याच्याकडून एकूण एक लाख पंधरा हजार किमतीची ई – बाईक जप्त करण्यात आली आहे.
ही कामगिरी मा.अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार महेश बारावकर, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सचिन सरपाले, अवधतु जमदाडे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, नवनाथ खताळ, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.












