दिनांक ११ ते २१ डिसेंबर दरम्यान झालेल्या पुणे शहर विभागीय क्रीडा समितीने आतरमहाविद्यालयीन डेव्हिड करंडक क्रिकेट (मुले) स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेत पुणे शहरातील एकूण ५० महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले होते.
२१ डिसेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय आणि नेस वाडिया महाविद्यालय यांच्यात चुरशीची लढत झाली. हा सामना सिंहगड महाविद्यालयाच्या मैदानावर खेळला गेला. मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय संघाने ५ गडी राखून विजयश्री खेचून आणली.
मागील १९ वर्षांमध्ये डेव्हिड करंडक स्पर्धेत मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय संघाने १२ वेळा विजेते पद, सहा वेळा उपविजेते पद तर एकदा तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हर, यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. महाविद्यालय क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मुरलीधर गायकवाड आणि प्रा. नितीन सुरते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. विजयी संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.












