पिंपरी – मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला होता. राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. या सगळ्या प्रकरणी आता सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याच मुद्द्याने पेट घेतला होता. आणि त्यानंतर जरांगेंची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली. भाजप नेत्यांच्या या मागणीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. आणि मनोज जारांगेंची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परंतु मनोज जरांगे न डगमगत न घाबरता चौकशीला सामोरे जाण्याचे विधान केले.
एसआयटी चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले मी मागे हटणार नाही. त्यांचं म्हणणं १० टक्के आरक्षण घ्यावं, मात्र मी आरक्षण दिलं तरी थांबणार नाही. अटक करून जेलमध्ये टाकले तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये देखील आमरण उपोषण करेन. ज्यांना 10 टक्के आरक्ष घ्यायचं त्यांनी घ्यावं पण आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहजे. सरकार किती दिवस दडपशाही करत ते बघू.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीय द्वेष करत आहे. गोरगरीब मराठ्यांनी मतदान केलं, म्हणून तुमच्या नेत्यांनी तुम्हाला जवळ केलं. मी बोललो देवेंद्र फडणवीस यांना, मात्र याचा राग मराठ्यांच्या नेत्यांना आला. त्यामुळे हे नेते तुमच्यासोबतलं असतील पण सर्व मराठा बांधव माझ्यासोबत आहे. एवढाच काय तर मला असं अस्वस्थ बघून मराठा समाजाला सहन होणार नाही. आणि या नेत्यांचा ठेकाही मी घेतला नाही असा निशाणा यावेळी जरांगेंनी सरकारवर साधला.
पुढे मनोज जरांगे असे हि म्हणाले कि, इंग्रजांनी केली नसेल इतकी भयंकर दडपशाही, जातीय द्वेष सरकार आणि गृहमंत्री फडणवीस करत आहेत. सोशल मीडियावर मराठा समाजबद्दल खुन्नस दाखवली जातेय. याच गोरगरीब मराठ्यांनी मतदान केल्याने तुम्ही नेते झालात. त्यामुळे सर्व मराठा आमदारांनी जातीकडून बोलायला हवं. पण कोणी बोलत नाही याच सरकारने आपली फसवणूक केली. आणि नेत्यांनी विश्वासघात केला म्हणून मला आज उपोषणात उतरावं लागलं. आणि मी आता मागे हटणार नाही. मी आरक्षण मिळवूनच गप्प बसणार असेही ते म्हणाले. दरम्यान परीक्षा सुरू असल्याने 3 मार्चपर्यंत आंदोलन स्थगित पण साखळी उपोषण सुरू आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.












