नगर : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांनी ओबीसींचे देशातील २७ टक्के आरक्षण चॅलेंज केल्यास रद्द होऊ शकते, असा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांच्या या विधानाचे पडसाद संपूर्ण देशातील ओबीसी समाजामध्ये उमटत आहेत लागले आहे. मनोज जरांगे यांनी हा इशारा नगरमध्ये दिला असल्याने ओबीसींचा तीन फेब्रुवारीला होणाऱ्या महाएल्गार मेळाव्यात त्याचे पडसाद जोरदार उमटण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे हे रायगडला पोहोचले आहे. त्यापूर्वी ते रात्री नगरमध्ये मुक्कामी होते. बुरुडगाव (ता. नगर) येथे त्यांनी मुक्काम केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगेंनी यावेळी ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना त्यांनी ओबीसी समाजाचे आरक्षणाला चॅलेंज केल्यास ते सर्वोच्च न्यायलयात रद्द होऊ शकते, असा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.
ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले, “आम्हाला ओबीसी बांधवांचे वाटोळे करायचे नाही. त्यांच्या अन्नात माती कालवायची नाही. छगन भुजबळांनी आमच्या अन्नात माती कालवत असेल, तर ओबीसी समाजाचे वाटोळे देखील त्यांच्याच मुळेच होईल. गावखेड्यातील ओबीसींनी हे समजून घेतले पाहिजे. नाईलाजास्वत मला ओबीसींचे आरक्षण चॅलेंज करावे लागणार आहे.
त्यांचा सुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही. आम्हाला ते सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे लागणार आहे. त्यांचे देशातील २७ टक्के आरक्षण रद्द होऊ शकते. हे फक्त मंत्री छगन भुजबळांमुळे वाटोळे होईल”. आमचे हक्काचे आरक्षण आहे. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणात आहेत. आमच्या अन्नात माती कालवल्यास नाईलाजास्तव ओबीसी आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून ते आरक्षण रद्द करावे लागेल आणि ते रद्द होणार आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता एकेरी भाषेत टीका करत होते. कोणी कार्यक्रम घ्यावा किंवा नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र ते येवल्याचं जे इकडे-तिकडे हिंडत आहे. त्याच्यासारखे आम्ही नाहीत. त्यांनी एखादा कार्यक्रम घेतला म्हणजे आम्ही घ्यायचा असे आम्ही करत नाही. उलट आमच्यामुळे झालेल्या कायद्यामुळे त्यांच्यातल्या ओबीसींना देखील फायदा होणार आहे.आमची नियत साफ आहे. नाहीतर आम्ही देखील म्हणू शकलो असतो की कायदा आमच्यामुळे झाला आहे. यातील ओबीसींना उडवा, असे देखील आम्ही म्हणू शकलो असतो.
ओबीसींच्या सग्यासोयर्यांना देखील फायदा होणार आहे. हा कायदा केवळ आमच्यासाठी आहे. पण आमची नियत साफ आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी, एनटीव्हीजेंना देखील फायदा होणार आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या नादी लागू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.












