असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर तर्फे सुंदर कांबळे शहराध्यक्ष, असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांनी आज अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या 139 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती श्री. तुकाराम भोंडवे माजी नगरसेवक, श्री अनिरुद्ध कांबळे वरिष्ठ उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस, श्री. राजाभाऊ गोलांडे माजी नगरसेवक मकरध्वज यादव, संदेश नवले, सौ. शितलताई कोतवाल समन्वयक उत्तर महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा, श्री. दिलीप पांढारकर वरिष्ठ उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर यांची होती. यावेळी उपस्थितांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ध्वजारोहण श्री. तुकाराम भोंडवे माजी नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले.
सुंदर कांबळे शहराध्यक्ष यांनी 1920 साली महात्मा गांधी यांनी इंग्रजांच्या विरोधात यल्गार नागपुर येथे पुकारला होता त्याच धर्तीवर आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर येथे भाजपच्या विरोधात यल्गार पुकारला आहे जसे एक व्यक्ती जर क्रांती करुन इंग्रजांना पळवून लावू शकतो तर आपण सर्वजण मिळून भाजपाला नक्कीच हरवू शकतो. प्रदेशाध्यक्षांच्या याच विचारांचे समर्थन करत सुंदर कांबळे यांनी असंख्य कार्यकर्ते व आमचा नाना पटोले यांना खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे.
यावेळी अजरुद्दीन पुणेकर अध्यक्ष ऑटो रिक्षा चालक मालक संघटना, सौ. अंजू खन्ना पिल्ले पिंपरी विधानसभा अध्यक्ष हातगाडी टपरी पथारी विभाग, सौ निकित बोराटे भोसरी विधानसभा अध्यक्ष सौ. स्नेहल मनोहर व सुरेखा गायकवाड सोशल मीडिया समन्वयक, प्रिती ओहोळ कार्यालयीन सचिव, कौशल्य सोनवणे ,वाघमारे ताई, भगवान दहातोंडे, पार्वतीबाई कांबळे, कुसुम भोळे, ममता पवार, शबकुन शेख, रोहिणी काळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप कांबळे पिंपरी विधानसभा अध्यक्ष यांनी केले. आभार दिलीप गायकवाड यांनी मानले












