देशात लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नुकतीच १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंञी नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. नितीन गडकरी यांना डावललं जातंय असे, म्हणत यावर खासदार संजय राऊतांनी याची कारणेही सांगितली आहेत.
नितीन गडकरी हे एक परखड आणि स्पष्टवक्ते असलेले नेते आहे. ते छञपती शिवाजी महाराज यांना मानतात, त्यामुळे ते दिल्लीची गुलामी पत्करणार नाहीत. असा त्यांचा स्वभाव आहे. नितीन गडकरी हे विकासाला महत्व देतात. फसवणुकीला ते महत्व देत नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.
आपल्या देशातील विकासामध्ये सर्वात मोठं योगदान नितीन गडकरी संभाळत अससेल्या मंत्रालयांचं आहे. गडकरी फसवणुकीला महत्व देत नाहीत अशा व्यक्तीला दिल्लीत पुन्हा संधी मिळाली तर २०२४ मध्ये भाजपला बहूमत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोणी नितीन गडकरींचे नाव पुढे केले तर ते तेथे असू नयेत म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचं हे षडयंञ आहे. असा दावा संजय राऊतांनी केला आहे.












