पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०९ : गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या तिघांना पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. ही घटना विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी हाशिम खलील शेख ( वय १८, रा. लेन नंबर २, विकासनगर कॉलनी, कलवड वस्ती, लोहगाव, पुणे ) याला व दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी दि. ०६ रोजी मध्यरात्री लोहगाव येथील बडी मज्जिद गल्लीपासून ते दत्त मंदिर चौक व दत्त मंदिर चौक ते खेसे पार्क रोड येथे रोडवर पार्क असलेल्या दुचाकी तीन चाकी व चार चाकी अशा एकूण 25 गाड्यांची कोयत्याने तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.
दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना बातमीदारां तर्फे बातमी मिळाली की, रात्री कलवड वस्तीमध्ये तोडफोड करणारे आरोपी हे कलवड वस्ती येथील मोकळ्या मैदानामधील झाडीमध्ये लपून बसलेले आहेत. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे.
त्यांच्याकडून एक लोखंडी हत्यार, एक सत्तुर आणि एक मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. रविंद्र कुमार वारंगुळे हे करत आहेत.
ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा.पोलीस उप आयुक्त श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आनंदराव खोबरे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता माळी, सपोनि विजय चंदन, पोलीस अंमलदार उमेश घेडे, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, सचिन जाधव, शैलेश नाईक, ज्ञानेश्वर आवारी यांनी केली आहे.












