पुणे, दि. ०६ : एका गुन्ह्यात चोरीला गेलेली गाडी अल्पवयीन मुलाकडून ताब्यात घेण्यात आली आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहन चोरीच्या घटनेत वाढ झाली होती.या सततच्या चोरीमुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असताना त्यांना कात्रज भाजी मंडई येथे एक अल्पवयीन मुलगा हा १,१०,०००/- रुपये किंमतीची व्हेस्पा दुचाकी गाडी घेऊन थांबला होता. त्याच्याकडे गाडीबाबत चौकशी केली असता ती गाडी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील एका गुन्हयातील असल्याचे समजल्याने ती जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री नारायण शिरगावकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन श्री. विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अक्घतु जमदाडे, मंगेश पवार, सचिन सरपाले, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, घनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.












