जबरदस्तीने घरात घुसून महिलेसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केल्याचा प्रकार कात्रज परिसरात घडला आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.४) सायंकाळी साडेसहा च्या सुमारास कात्रज येथील सच्चाईमाता मंदिर परिसरातील एका कॉलनीत घडला आहे.
याबाबत २९ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.६) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन नेताजी भारत माहोर (वय ३७ रा. संतोष नगर, कात्रज) याच्यावर भा.दं.वि. कलाम ३५४, ३५४अ, ३५४ ब, ५०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सोमवारी सायंकाळी फिर्यादी महिला घरामध्ये काम करत असताना आरोपी अचानक त्यांच्या घरी आला. त्याने पाठीमागून पकडून महिलेसोबत गैरवर्तन केले. त्याला विरोध केला असता आरोपीने जबरदस्तीने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भाबड करीत आहेत.












