पुणे, दि. ०३ : राहुल मुकेश सिंग आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली आहे.ही घटना चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी राहुल मुकेश सिंग ( वय १९ वर्षे, रा. सणसवाडी, पुणे ), प्रसाद संतोष भोंडवे ( वय १८ वर्षे, रा. खराडी रोड, चंदननगर, पुणे ), राज राहुल नगराळे ( वय १९ वर्षे, रा. गलांडेनगर, जुना मुंढवा रोड, पुणे ) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत वडगाव शेरी येथून पायी जात होते. त्यावेळी मोटारसायकल वरून आलेल्या इसमांनी त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला आहे.
आरोपींनी मागील १० वर्षात जबरी चोरी करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोचवणे, चोरी करणे असे अनेक प्रकारचे गुन्हे केलेले आहेत.
आरोपींविरोधात भादवि कलम ३९२,३४ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे ३ (१) (ii).३(२). ३(४) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मा अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा यांनी दिलेल्या आदेशावरून चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र लांडगे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-४. पुणे, श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा, पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे श्री. संजय पाटील यांच्या अधिपत्याखाली आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.












