पुणे, दि. २८ : घरफोडी किंवा जबरी चोरी यांसारखे गंभीर स्वरूपातील गुन्हे करणाऱ्या परप्रांतीय टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही घटना खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
या प्रकरणी सुंदरसिंग भयानसिंग भुरीया ( वय-२५ वर्षे ), मुकेश ग्यानसिंग भुरीया ( वय-२७ वर्षे ), सुनिल कमलसिंग आलावा ( वय-२८ वर्षे ), रा. ग्राम २२ वर्षे, हरसिंग वालसिंग ओसनिया ( वय-२२ वर्षे ) सर्व रा. गांव तहसिल कुक्षी, थाना बागमेर, जि. धारा मध्य प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०६ ऑक्टोंबर रोजी फिर्यादी हे बोपोडी येथे सेक्युरिटी गार्ड म्हणून काम पाहत होते. यावेळी आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने २१०० रुपये रोख रक्कम चोरी करून घेऊन गेले आहेत.
आरोपींविरोधात भादवी कलम ३९२.३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, श्रीमती आरती बनसोडे ह्या करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र सहाणे व पोलीस उप- आयुक्त, परि-४, पुणे शहर, श्री. शशिकांत बोराटे यांनी आरोपींवर मकोका कारवाई केली आहे.












