कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या जेएन १ चे पुणे शहरात दोन तर पुणे ग्रामीणमध्ये एक रुग्ण आढळला आहे.
यामुळे राज्यातील रुग्णसंख्या दहा झाली आहे. या सर्व रुग्णांना नवीन व्हेरियंटची सौम्य लक्षणे होती. त्यांना घरीच विलिगीकरणात ठेवण्यात आले. आता ते बरे देखील झाले आहेत.
पुणे शहरातील रुग्ण अमेरिकेतून आला होता. ४१ वर्षीय पुरुषाला कोरनाच्या नवीन व्हेरियंटची लागन झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात कोरोनाचे मिळालेल्या दहा पैकी आठ जणांनी लस घेतली आहे. सर्वांचे वय ४० पेक्षा जास्त आहे.












