संतोष चोरडिया हे रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि चित्रपटअशा तीनही माध्यमांमध्ये गेली ३८ वर्षे कार्यरत होते.
हास्यसम्राट कार्यक्रम तसेच एम २ जी २ या सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमात वर्षा उसगावकर यांची घेतलेल्या मुलाखतीने ते घराघरात पोहचले.जीना इसी का नाम है, फुल २ धमाल या कार्यक्रमाची निर्मिती व सादरीकरण ते करत असत.
लंडन, इस्त्राइल, ओमान अशा देशातील रसिकांना हसवा हसवी या एकपात्री प्रयोगाने ते सर्वपरिचित होते. त्यांनी १५ हजारांहून अधिक प्रयोग केले. दुसरी गोष्ट, कॅपचीनो, दगडाबाईची चाळ, प्रेमा, सरगम इत्यादी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या होत्या.
आपल्या एकपात्री प्रयोगातून त्यांनी सातत्याने एड्सग्रस्त आणि कृष्ठरोग्यांमध्ये आनंद पेरण्याचे काम केले. आम्ही एकपात्री संस्थेच्या माध्यमातून एकपात्री कलाकारांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्याचे काम ते करत असत.












