शेजारी शेजारी राहणार्या व जमिनीवरुन वाद असलेल्या सावत्र चुलत भावांमध्ये जमिनीवरुन वाद होत होते. त्यात सरकारी डीपी बंद केल्याने लाईट गेली. त्यावरुन दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत ७० वर्षाच्या आजीसह सहा जण जखमी झाले. याबाबत द्रौपादाबाई मारुती जाधव (वय ७०, रा. नेरे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रदीप पांडुरंग जाधव, शिवाजी पांडुरंग जाधव आणि पांडुरंग जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दुकानाची वीज गेल्याने ते डिपीमधील फ्युज गेला आहे का हे पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा सावत्र चुलत भाऊ विशाल जाधव तेथे आला व म्हणाला तू आमच्या हद्दीत यायचे नाही. त्यावर फिर्यादी म्हणाले की, माझ्या दुकानाची लाईट गेली आहे. डिपी सार्वजनिक आहे.
त्यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली.तेव्हा तेथे उभे असलेल्या मित्रांनी त्यांची भांडणे सोडवली.थोड्या वेळाने त्यांच्या घराकडे आरडाओरडा झाल्याचा आवाज आला. ते दुकानातून घरी गेले.तेव्हा फिर्यादी यांची आई, वडिल, पत्नी यांना विशाल जाधव, अनिता, सुनिता, सावत्र चुलते मारुती जाधव हे मारहाण
करत होते. फिर्यादी हे भांडण सोडविण्यासाठी गेले असताना विशाल याने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली.त्याने त्यांना चक्कर आली. फिर्यादी यांचा मोठा भाऊ शिवाजी जाधव यालाही विशालने लोखंडी रॉडडोक्यात मारुनजखमी केले. पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.












