पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २७ : आकुर्डी येथील नामांकित डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च या महाविद्यालयाला केंद्रीय शिक्षण मंत्रालायाकडून थ्री पॉईंट फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त झाले. महाविद्यालय हे खाजगी महाविद्यालयाच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय ठरले म्हणून हा बहुमान प्राप्त झाला. महाविद्यालयाच्या इनोव्हेशन आणि इंक्युबेशन सेलच्या उत्कृष्ठ कामगिरीसठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोवेशन काउन्सिल अन्तर्गत हे मानांकन देण्यात आले.
या मानांकनसाठी संपूर्ण देशातून महाविद्यालये सहभाग घेतला होता.या मानांकनसाठी महाविद्यालयाच्या इनोव्हेशन आणि इंक्युबेशन सेलच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विद्यार्थी व प्राध्यापक यांनी संशोधनाची सवय अंगिकृता करावी यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांची दखल घेतली जाते.
डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च या महाविद्यालयात इनोव्हेशन, स्टार्ट अप एंटरप्रेन्युअरशिप आणि बौद्धिक संपदा हक्क या सारख्या अत्याधुनिक विषयाचा सुरेख संगमघालून एक परिपूर्ण अशी इकोसिस्टम विद्यार्थ्यांच्या व प्राध्यपकांच्या सर्वांगीण विकासासाठी निर्माण केली आहे म्हणून या सारखे विविध मानांकनांनी या महाविद्यालयाला सन्मानित करण्यात आले आहे.
या मानांकनसाठी महाविद्यालयाच्या इंक्युबेशन सेल प्रमुख डॉ वंदना पाटील, इनोव्हेशन आणि अंतर्गत येणार्या सर्व प्राध्यापक सदस्य,सर्व विभागप्रमुख यांनी परिश्रम घेतले. मानांकनाच्या यशासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील, उपप्राचार्य डॉ सुनील डंभारे, कुलसचिव वाय के पाटील तसेच सर्व विभागप्रमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मिळालेल्या मानांकना बद्दल डॉ डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रिअर ऍडमिरल अमित विक्रम, डी. वाय. प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस एस. पाटील , संस्थेचे चेअरमन सतेज डी. पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले












