पिंपरी(प्रतिनिधी) डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच किवळे येथील ‘स्नेहसावली: आपले घर’ या वृद्धाश्रमाला भेट देऊन,वृद्धांसमवेत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. विद्यालयातर्फे चालविण्यात येणाऱ्या जॉय मेकर क्लबमार्फत औषधनिर्माणशास्त्र पदवीच्या विद्यार्थ्यांनी ‘
या आश्रमातील वृद्धांना भेटवस्तूंचे वाटप केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी तेथील आजी- आजोबांशी हितगुज साधून त्यांचा एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तेथील वृद्धांना साड्या व इतर साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे.
यासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, प्रा. मुकेश मोहिते व इतर शिक्षकांनी प्रेरीत केले. यावेळी तुषार गौड, कमलेश चौधरी, अमन पटेल, संजना पाटील, अमन यादव, प्राजक्ता सुर्यवंशी, निकिता जाधव, अंकिता अभंग, वेदांग जाधव, संतोष चौधरी, वेदिका वाल्हेकर, दिपाशा सुगनाणी, ओंकार शेंडगे, मेघा तक्रारी आणि प्रसन्न माहोरे यांनी आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. मारुफ शिकलगार आणि साक्षी शिंदे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते












