पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १० : चिंचवड येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ.अरविंद ब.तेलंग इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये ” ग्रीन क्लब” चे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कॉनराड हॉटेलचे
महाव्यवस्थापक अभिषेक सहाय,कॅंप एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, तेलंग हॉटेल मॅनेजमेंट इंस्टिट्यूटचे डॉ. अजयकुमार एम. राय आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिप्रज्वलनाने होवून प्राचार्य डॉ. राय म्हणाले कि , युजीसी, महाराष्ट्र राज्य, युनिसेफ आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, महाविद्यालयीन युवकांच्या सहभागाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांन मध्ये पर्यावरण संवर्धन जाणीवा व जागृती दृढ होण्यासाठी ग्रीन क्लब ची स्थापना करण्यात आली आहे.
प्रा. रणजित पाटील यांची “ग्रीन क्लब समन्वयक” म्हणून तर द्वितीय वर्षातील विद्यार्थी अनिकेत करांडे याची “विद्यार्थी समन्वयक” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या उपक्रमाच्या “अध्यक्ष” पदाची जबाबदारी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अजयकुमार एम. राय यांच्यावर असणार आहे. प्रा. वैष्णवी हरडे यांनी अतिथींचा परिचय करून दिला.
श्री सहाय म्हणाले कि , नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण, संवर्धन व पाण्याची बचत हे खूप गरजेचे बनले आहे. त्याचे महत्व समजून घेऊन ते वाचविणे हि युवकांची जबाबदारी आहे, असे सांगितले. प्रत्येक हॉटेल ला देखील ग्रीन ऑडिट करून घेणे आता सक्तीचे झाले असून महाविद्यालय आतापासूनच विद्यार्थ्यांना या गोष्टीची शिकवण देत आहे हे बघून खूप आनंद झाला. आताच मुलांना पर्यावरणाचे सर्व महत्व कळले तर भविष्यात त्याचा फायदा होईल. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यावेळी ग्रीन क्लबचे समन्वयक प्रा. रणजित पाटील यांनी आभार मानले.












