महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल कडून आयोजन
पुणे : सामाजिक कार्यकर्ते तसेच ‘निर्भय बनो अभियान’चे डॉ.विश्वंभर चौधरी यांच्यावर सिन्नर येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार ,दि.९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता गांधी भवन ,कोथरूड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष व युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी,राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी ,
निर्भय बनो अभियानचे डॉ. विश्वंभर चौधरी हे या सभेत सहभागी होणार आहेत. युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर हे सभेच्या अध्यक्षस्थानी असतील.सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक संदीप बर्वे(सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी),अप्पा अनारसे( संघटक, युक्रांद), सचिन पांडुळे, शाम तोडकर,सुदर्शन चखाले, नीलम पंडीत, ऍड. राजेश तोंडे, प्रिया नेमाने, गणेश गाढवे, रोहन गायकवाड, दीपक मोहिते, विवेक काशीकर,राहुल तरकसे यांनी केले आहे.












