ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ . संजीव ठाकूर यांना हटवण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द केली आहे.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हेच ड्रग तस्कर ललित पाटीलवर उपचार करत होते. पाटीलला ससूनमध्ये ठेवण्याची शिफारसही डॉ. ठाकूर यांनीच कारागृहाला पत्राद्वारे केल्याचे स्पष्ट झाले. राज्य शासनाच्या चौकशी समितीने अहवालात ससून प्रशासनावर ठपका ठेवला असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजले होते.
डॉ. संजीव ठाकूरया पार्श्वभूमीवर डॉ. ठाकूर यांची बदली किंवा निलंबन होणार , हे स्पष्ट झाले होते.डॉ . ठाकूर यांच्यावर सर्व स्तरांतून जोरदार टीकाही होत होती . या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने त्यांची नियुक्ती रद्द केल्याचा निकाल दिला आहे.












