पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १० : तडीपार झालेल्या आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही घटना देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी अमित गजानन वानरे ( वय ३२, रा. शिवशंभू कॉलनी, आदर्श नगर, किवळे, पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे युनिट पाच हे तडीपार आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी पेट्रोलिंग करत असताना दि. ०९ रोजी आदर्श नगर येथील साई ओरा सोसायटी जवळ आरोपी मिळून आला.
आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ पाचशे रुपये किमतीचा एक कोयता मिळून आला आहे. आरोपीवर यापूर्वी चिंचवड, देहूरोड, खडकी, तासगाव, चाकण, निगडी इत्यादी ठिकाणच्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद आहे.
आरोपी विरोधात भादवि कलम आर्म ॲक्ट ४ २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुण्याचा पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.












