सोसायटीच्या कॉमन एरिया वापरण्याच्या कारणावरुन एका तरुणीला मारहाण करुन तिच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला. याप्रकरणी सात जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी चार ते पाच या कालावधीत वानवडी येथील केदारीनगर येथे घडला होता.
याबाबत पीडित मुलीच्या ५० वर्षीय आईने शुक्रवारी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रीत कौर, क्रिस्टोफर जॉन बॉस्को, श्वेता उमेश शेट्टी, गजेंद्र सिंग गोविंदसिंग, सचिन कदम, जयेश गिरीश माली व एका महिलेवर भा.दं.वि. कलम ३५४, ३५४(अ), ३२३, ४२७, ५०४, १४३, १४७, १४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच सोसायटीत राहतात.
फिर्यादी यांची मुलगी सोसायटीच्या टेरेसवर फिरत होती. त्यावेळी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमा करुन सोसायटीच्या कॉमन एरिया वापरण्याच्या कारणवरुन मुलीलाशिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. आरोपी गजेंद्र गोविंदसिंग याने फिर्यादी यांच्या मुलीच्या अंगावरील कपडे फाडून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच तिचा फोन खाली आपटुन नुकसान केले. याबाबत महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. तक्रार अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे करीत आहे.












