महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे हे अंतिम वेळापत्रक असून, बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे.
विद्यार्थ्यांना सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
२०२४ मध्ये बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्ष्यी आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. त्याचप्रमाणे, बारावीच्या माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा २० ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे.
तर, एसएससी बोर्ड परीक्षा १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. विद्यार्थ्यांना दिनांकनिहाय परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे.












