पुणे । प्रतिनिधी
पुणे दि.१३ : दिवाळीचा सण सर्वांना आनंदात आणि उत्साहात साजरा करता यावा, यासाठी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोसिएशनने आळंदी येथील श्री माऊलीकृपा ज्ञानदान अन्नदान संस्था बालग्रह येथे अन्नदान व फराळाचे वाटप केले.
आळंदी येथे झालेल्या या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड. गोरख कुंभार, सचिव ॲड. अक्षय केदार, महिला सचिव ॲड. वर्षा कांबळे, सदस्य ॲड. जयेश वाकचौरे, तसेच ॲड. बी. के. कांबळे, ॲड. अरुण खरात, ॲड. नितीन तिडके, ॲड. कुलदीप बकाल, ॲड. नारायन थोरात, ॲड. पांडुरंग शिनगारे, ॲड. राकेश जैद, ॲड. रोहीत भोसले उपस्थित होते.
यावेळी असोसिएशनच्या अध्यक्ष ॲड. प्रमिला गाडे यांनी सांगितले की, नवनियुक्त कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा निश्चय केला असून त्या अनुषंगाने या सामाजिक उपक्रमाने सुरुवात केली आहे.
येथे येऊन चिमुकल्यांसोबत आम्ही दिवाळी साजरी केल्याने आमची दिवाळीही आनंददायी व समाधानकारक झाली आहे. भविष्यातही ॲडव्होकेट असोसिएशन अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करणार आहे असेही त्यांनी सांगितले.












