पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०९ : दिवाळी म्हणजे विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतेषबाजी ,उल्हास, उत्सव ,प्रेमाने भरलेला सण म्हणजे दिवाळी. पण आपल्या देशात 25 कोटी नागरीक दारिद्र रेषेखाली पाहाडी, दुर्गम भागात ,जंगलात रहात आहेत. त्यांना कसली दिवाळी? ते पोटाची खळगी भरण्यासाठी भटकत असतात,आपल्याबरोबर पहाडी, दुर्गम भागातील कातकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व दिलासा संस्थेच्या माध्यमातून अन्न दान, श्रेष्ठ दान समजून दुर्गम भागात वाड्या, वस्त्यावर जाऊन टेम्पो भरून साहित्य लोक सहभागातून जमा झाले.
धान्य, कपडे, तेल, मिठाई, साखर, गहू , ज्वारी, पोहे सह 15 वस्तूचे एक किट, प्रत्येकी पैठणी साडी व तीन नवीन साडया, एकूण सहाशे पेक्षा जास्त साड्या व लहान मुलांचे ड्रेस त्यांच्या वाड्या वस्त्यावरील राऊतवाडी येथील कातकरी समाजाच्या कुटुंबाच्या घरी जाऊन देण्यात आले. त्याठिकाणी 60 कुटुंबांची दिवाळी साजरी होईल एवढे साहित्य त्यांना दिले.त्यानंतर चिंचवड येथील गुरूकुलम, विश्वनाथ वाघमोडे यांच्या अपंग विद्यालय निगडी या ठिकाणी दिले, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचीच दिवाळी झाल्याचे समाधान आम्हाला वाटलेला असे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक म्हणाले की 15 दिवस आम्ही घेतलेले परिश्रम व त्याचे चीज झाले खूप आनंद झाला खऱ्या गरीब गरजूवंतापर्यंत पोहोचल्याचे समाधान मिळाले सर्व नागरिकांनीही आम्हाला सढळ हाताने मदत केली म्हणूनच शक्य झाले असे समाज उपयोगी उपक्रम यापुढे आमच्या दोन्ही संस्था असे उपक्रम राबवतील.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कुरुंज गावचे सरपंच सदाशिव शेंडगे होते तर प्रमुख पाहून निवृत्त पोलीस आधिकारी मारुती मोहीते होते.
यावेळी शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महिला अध्यक्षा मीना करंजावणे,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, गुणवंत कामगार भरत शिंदे, मा.पोलीस निरीक्षक मारुती मोहीते,सा.का.शंकर लगड, गजानन धाराशिवकर,विकास शहाणे, गणेश वाडेकर, राकेश वारेगावकर प्रकाश वीर,सा.का.गणेश रनवरे ,गुणवंत कामगार काळुराम लांडगे,मुरलीधर दळवी,शामराव सरकाळे,प्रताप देवडकर, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.












