आज दि. २१ फेब्रुवारी रोजी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या वतीने शीतळानगर नं. १ येथील सुरू असलेल्या एका पत्राशेड घराचे नूतनीकरण थांबवून त्याची कारवाई करण्यात आली आहे. हे नूतनीकरणचे काम रांजले परिवारातर्फे करण्यात येत होते. मात्र आजूबाजूच्या काही लोकांनी कँटोन्मेंट बोर्डला चुकीची माहिती देत व हे नवीन बांधकाम असल्याचे दर्शवत याच्या विरोधात वारंवार तक्रार केली असल्याची माहिती संबंधित परिवाराने दिली आहे.
त्याचप्रमाणे ते म्हणाले की ,कंटोनमेंट बोर्डने कुठलेही प्रकारे शहानिशा न करता आम्हाला दि. १५ रोजी नोटीस दिली. जे आम्हाला दि. १६ ला प्राप्त झाली व आम्ही आमचे स्पष्टीकरण देण्यापूर्वी कँटोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱ्यांनी आज रोजी येऊन आमचे हे बांधकाम पाडले. तसे पाहायला गेले तर देहूरोड येथे कँटोन्मेंट बोर्डच्या हद्दीत अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने रस्त्याच्या कडेला बांधकाम व अतिक्रमण करण्यात आले आहे. मग या सगळ्या गोष्टींवर का दुर्लक्ष करत आहे? त्याचप्रमाणे काही निवडक लोकांना वेठीस धरून फक्त त्यांच्यावरच कारवाई का केली जात आहे? हा एक संशोधनाचा मुद्दा आहे.











