पुणे | प्रतिनिधी
पुणे : बंगळूरु महामार्गावर नव्या कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहे.
मागून येणाऱ्या ट्रकने समोरील ट्रकला धडक दिली व समोरील ट्रक रस्त्यामध्ये आडवा झाला.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याचे वृत्त समोरीत आहे. काही तासांसाठी बंगलोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.












