
पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १६ : दैनिक राज्य लोकतंत्र आणि पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड बार कोर्ट रूम, नेहरूनगर येथे (दि.१६) दुपारी २ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सौ.चित्रा रवींद्रनाथ सोनईकर (योगपंडित ) यांच्या योगाचे महत्व पटवून देण्यासाठी वकील वर्गाकडून ह्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ.चित्रा रवींद्रनाथ सोनईकर (योगपंडित ) यांनी योगाचे आपल्या आयुष्यातील महत्व पटवून दिले तसेच योग हा शरीरासाठी किती आवश्यक आहे हे देखील सांगितले. “माणसाला नेहमी निरोगी राहायचे असेल तर त्याने शरीराची उत्तम काळजी घेणे गरजेचे आहे. आजकाल हृदयविकार हाडांचे विकार असे बरेच आजार आपल्याला होत असतात त्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. आपले ब्लड प्रेशर, रक्तातील साखरेचे प्रमाण नेहमी खाली – वर होत असते”. या होणाऱ्या प्रमाणाला एका पातळीवर आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सौ.चित्रा सोनईकर (योगपंडित ) अनेकांना निगडी प्राधिकरण येथे योगाचे धडे देत असतात. या व्याख्याना दरम्यान अनेक वकील बंधू आणि भगिनींनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांच्या शंकेचे निरसन करीत उत्तरे दिली.
या कार्यक्रमाचे आभार पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन च्या उपाध्यक्षा सौ. जयश्री विलास कुटे यांनी मानले.












