उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात ‘पीएच.डी’ करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विषयासंदर्भात बोलताना एक धक्कादायक विधान केले होते.
“पीएच.डी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत ?”, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनं देखील केली.
अजित पवारांच्या या विधानावर राजकीय नेत्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. यानंतर अखेर अजित पवारांनी यावर भाष्य करत पीएच.डी वरील आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला, आपण याबाबत दिलगिरी व्यक्त केली असल्याचे स्पष्टीकरण पवार यांनी दिले.












