पुढील २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पूर्व आणि आग्नेय दिशेने बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे पुढील २४ तासांत गोवा दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली, सातारा जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
रविवारनंतर ढगाळ वातावरण कमी होऊन आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शुक्रवारी सांताक्रुझ येथे सर्वाधिक ३५.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची आणि यवतमाळ येथे १६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.












